कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात! कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले; वाचा भाव

नाशिक |  शेतकरी आणि शेती हा आपल्या देशात नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारा विषय बनला आहे. निसर्गाच्या हवाल्यानं केला जाणारा व्यवसाय म्हणजे शेती होय.

सरकारची धोरणं आणि निसर्गाची किमया यावर शेतीचं अर्थकारण चालत आलं आहे. शेती निसर्गाच्या आणि सरकारी धोरणाच्या अधिन राहूनच केली जाते.

शेतकरी कधी सरकारी धोरणानं तर कधी निसर्गामुळं त्रस्त असतो. अशातच आता राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे.

गेल्या आठवड्यात आलेल्या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकावर घाला घातला आहे. अशातच सध्या कांद्याचा भाव प्रचंड कोसळला आहे.

लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव घसरला आहे. मनमाडमध्ये कांद्याला फक्त 6.50 रूपये भाव मिळाला आहे.

कांद्याला भाव नसल्यानं शेतकऱ्यांना मोठी काळजी लागली आहे. मोठ्या कष्ठानं पिकवलेल्या कांद्याला भाव लागत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी 21 रूपयांवर असलेला कांदा चक्क साडेसहा रूपयांवर आला आहे. मागणी कमी आणि पुरवठा जास्त होत असल्याचं सध्या दिसत आहे.

आम्ही पिकवत असलेल्या पिकाचे भाव आम्हालाच ठरवू दिले पाहिजेत, अशी मागणी सध्या शेतकरी करत आहेत. असं असलं तरी सरकारी धोरणं महत्त्वाची भूमिका बजावतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

 कोरोनाचा पुन्हा उद्रेक! चीन सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; भारतासह जगावर परिणाम होणार

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

 मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल 

‘तुम्ही डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?’; गृहमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

  ‘काॅंग्रेस मूर्खांच्या नंदनवनात रमलीय’; ‘या’ काॅंग्रेस नेत्याचा हल्लाबोल