Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट

मुंबई | जागतिक महिला दिनानिमित्त मुंबईचे (Mumbai) पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस दलामधील महिला कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. आजपासून मुंबई पोलीस दलामधील महिलांना 8 तासांची ड्युटी असणार आहे.

घर आणि कर्तव्य यामध्ये समतोल करता यावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला (Women’s) दिनापासून पुढील आदेशापर्यंत महानगरात हे निर्देश लागू असणार आहे, असं अधिकार्‍यांनी यावेळी सांगितलं आहे.

संजय पांडे यांनीच या वर्षी जानेवारी महिन्यात राज्याचे कार्यकारी डीजीपी म्हणून 24 तास ड्युटी उपक्रमाला सुरुवात केली होती. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, सीपीच्या आदेशानुसार महिला कर्मचाऱ्यांसाठी 2 पर्याय आहेत. पहिल्या पर्यायामध्ये त्यांना सकाळी 8 ते 3, दुपारी 3 ते 10 आणि रात्री 10 ते सकाळी 8 अशा तीन शिफ्टमध्ये काम करावं लागेल.

दुसऱ्या पर्यायामध्ये, शिफ्टच्या वेळा सकाळी 7 ते दुपारी 3, दुपारी 3 ते 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी ड्युटीच्या वेळेबाबत महिला कर्मचाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही पर्यायांनुसार त्यांना ड्युटी सोपवावी, असं आदेशात म्हटलं आहे.

दरम्यान,मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. याच कारणामुळे 12 तासांची ड्युटी त्यांना कागदोपत्री असली तरीही अनेकदा त्यांची ड्युटी 16 ते 24 तासांपर्यंत सुरूच राहाते.

याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर होतोच मात्र सोबत घरात योग्य वेळ देता न आल्याने कौटुंबिक जीवनावरही याचे परिणाम होतात. याच कारणामुळे टप्प्याने संपूर्ण राज्यात 8 तासाच्या ड्युटीची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र मुंबईत अद्याप ती झालेली नव्हती.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड! 

निवडणुकीच्या निकालाआधीच काँग्रेस सावध; घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“…त्यांचं वाटोळं होईल आणि त्यांना दिव्यांग मुलं जन्माला येतील” 

निवडणुका संपताच पेट्रोल, डिझेलचा भडका, वाचा काय आहे आजचा भाव