मुंबई | विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदारांना होळीचं गिफ्ट दिलंय. आमदारांच्या स्थानिक विकास निधीत (MLA Local Development Fund) 1 कोटीची वाढ केलीय.
आमदारांचा निधी आता 5 कोटी होणार आहे. इतकंच नाही तर आमदारांचे पीए आणि ड्रायव्हरचा पगारातही 5 हजारांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांच्या ड्रायव्हरचा पगार आता 15 हजार रुपयावरुन 20 हजार रुपये, तर आमदारांच्या पीएचा पगार 25 हजारावरुन 30 हजार होणार आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे आमदारांच्या निधीत दोन वर्षात वाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे आता आमदारांच्या निधीत 1 कोटींची वाढ करण्यात आली आहे. तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे, असं अजित पवार म्हणालेत.
तसंच कोरोनाच्या संकटासह नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना राज्य सरकारने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे राज्याची विकासाची घोडदौड सुरु आहे. कोरोना काळात राज्यशासनाने केलेल्या कामाचे देशभरात कौतुक झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग क्षेत्रांच्या विकासाच्या पंचसुत्रीसाठी तीन वर्षात चार लाख कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
शेतकरी हा राज्याच्या विकासाचा केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्पात कृषी व संलग्न क्षेत्राला भरीव निधी देण्यात आल्याचंही अजित पवारांनी सांगितलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Mr. IPL इस बॅक! ‘या’ नव्या इनिंगसह आयपीएलमध्ये रैनाची दमदार एन्ट्री
चीनमध्ये कोरोना परिस्थिती हाताबाहेर; मोदी सरकार अॅक्शन मोडवर
Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये केमिकल वाॅर होणार???, जगाचं टेन्शन वाढलं
“CD होती पण वेळ नव्हती, आता CD बाहेर काढणार”; एकनाथ खडसेंचा पुनरूच्चार
Holi: होळीत केसांची घ्या खास काळजी; ‘या’ पाच ट्रिक नक्की वापरुन पाहा