शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा

मुंबई | शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसलाय. ठाण्यातील शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, पक्षाला पुन्हा एक मोठा धक्का दिला आहे.

शनिवारी सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत नरेश म्हस्के यांनी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत, सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच शिवसेनेतील आमदारांनी त्यांना साथ दिली आहे. तसेच इतर अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीत राहून शिवसेनेची गळचेपी झालेली आहे, त्यामुळे आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीकाही करण्यात आली. यावेळी नरेश म्हस्केही सहभागी झाले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांसह अपक्ष आमदारांना सोबत घेऊन बंडाचं हत्यार उपसलं आहे.

भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा.. जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच.. पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची राष्ट्रवादी गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

आमच्या सर्व शिवसैनिकांचे एकच म्हणणे आहे की, आजही आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेत राहणार आहोत. आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात आहोत., असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

“साहेब, यंदा पण पांडुरंगांची आरती तुमच्याच हातून होणार” 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”

मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू