भाजपला मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याचा सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी | गोव्यातील भाजप नेते मायकल लोबो यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली असून अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात आल्या आहेत.

सपत्नीक मायकल लोबो हे काँग्रेस पक्षामध्ये (Goa Congress) दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे.

पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण अधिकच रंगतदार स्थितीत आलं आहे.

भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो (Michael Lobo) हे एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी पंगा घेतला होता.

गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मायकल लोबो यांच्या कळंगुटमधील घरी गेले होते. त्यांच्या घरी जाऊन फडणवीसांनी मायकल लोबोंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण चर्चा झाली नसेल, अशी शक्यता कमीच आहे.

अत्यंत आक्रमक झालेल्या मायकल लोबो यांना थंड करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाले असावेत, असे तर्क त्यावेळी राजकीय जाणकारांनी वर्तवले होते.

आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्यानंतर अखेर मायकल लोबो यांनी कमळाला टाटा-बायबाय केलंय. काँग्रेसचा हात तर त्यांनी हातात घेतला आहेच. शिवाय आपल्या पत्नीलाही काँग्रेसमध्ये सोबत घेतलं. यामागेही महत्त्वाचं कारण आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपला उत्तर प्रदेशमध्येही मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काही आमदारांसह नेत्यांनी भाजपला रामराम केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्क्यावर धक्के; आता ‘इतक्या’ आमदारांनी दिला राजीनामा 

 पर्यटनस्थळांबाबत मोठा निर्णय, फिरायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद