मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अमरावती | हनुमान चालीसा प्रकरणावरुन आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या अडचणी वाढलेल्या पहायला मिळाल्या.

देशद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यांना अटक करण्यात आली होती. तब्बल 13 दिवसांनंतर तुरुंगातून त्यांची सुटका झाली. मात्र अद्यापही त्यांच्या अडचणी कायम असल्याचं दिसत आहे.

36 दिवसांनंतर परतलेल्या राणा दाम्पत्यांचं अमरावतीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं. काल झालेल्या जल्लोषात नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचं चित्र पहायला मिळालं.

अमरावतीमध्ये नियम मोडत झालेल्या जंगी स्वागतामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

रात्री दहानंतर लाऊड स्पीकर्सची परवानगी नाही. मात्र काल अमरावतीत त्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर्स लावून हनुमान चालिसा पठण आणि हनुमानाची आरती सुरु होती.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या अडचणी काही संपायचं नाव घेईनात. रोज कोणत्या न कोणत्या अडचणीत सापडत असलेले पहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित

  अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त

  मोठी बातमी! राज्यात ‘इतक्या’ हजार पदांसाठी पोलीस भरती

  पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  टेस्ला कार भारतात आणण्याविषयी Elon Musk यांचा मोठा निर्णय, म्हणाले…