Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन

मुंबई | निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपचे नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ शिंह (BJP leader Rajnath Singh) यांनी शरद पवार (sharad pawar) आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती (mayavati) यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी राष्ट्रपती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच आज राजनाथ सिंह यांनी ममता बॅनर्जी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मल्लिकार्जुन यांनी भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्या नावावर चर्चा करु, असं राजनाथ यांना सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील, अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती.

शरद पवार यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) देखील प्रचंड आग्रही होत्या. पण पवारांनी तो प्रस्ताव नाकारला आहे.

दरम्यान, श्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West bengal CM Mamata Banerjee) यांनी देशातील विरोधकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 17 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी” 

“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनिल परब यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस”

‘हे योग्य नाही’; दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं