मुंबई | संतोष परब हलल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात त्यांचे बंधु माजी खासदार निलेश राणे यांना मोठा झटका बसला आहे.
माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर कोर्टाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी सिंधुदुर्गच्या (Sindhudurga) जिल्हा पोलीस अधिक्षकाना पत्र लिहिलं होतं.
निलेश राणेंची पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 5 किंवा त्यापेक्षा जास्त जमाव केल्या प्रकरणी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, तसेच पोलिसांशी हुज्जत घातली या प्रकरणी 186, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग सेशन्स कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळला. कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी थांबवली. यावेळी नितेश राणे यांचे भाऊ माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांना अडवलं.
यावेळी निलेश राणे आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. नितेश राणे यांच्या जामीन अर्जाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. कोर्टाची ऑर्डर द्या, असं निलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”
अंकिता पाटील ठाकरेंची दत्तात्रय भरणेंवर टीका, म्हणाल्या…
काँग्रेस नेत्यांना मोठा झटका, पक्षाने घेतला हा महत्वाचा निर्णय
मोठी बातमी! एअर इंडियानंतर आणखी एक सरकारी कंपनी होणार रतन टाटांची
‘धोका टळलेला नाही…’; WHO ने दिला अत्यंत गंभीर इशारा