मोठी बातमी ! ट्विटरनंतर आता Elon Musk खरेदी करणार ‘ही’ कंपनी, पाहा ट्विट

नवी दिल्ली | जगातील प्रसिद्ध श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतलं आहे. सोशल मीडियावर सध्या याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.

ट्विटर खरेदी केल्यानंतर एलाॅन मास्क आता नव्या घोषणेच्या तयारीत असलेले पहायला मिळत आहे. एलाॅन मस्क आता साॅफ्ट ड्रिंक कंपनी कोका कोला खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.

कोका कोला कंपनी खरेदी करण्याविषयी एलाॅन मस्क यांनी एक ट्विट केलं आहे. हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असेलेलं पहायला मिळत आहे.

मी कोका-कोला कंपनी खरेदी करणार आहे.  कोका-कोलामध्ये पुन्हा एकदा कोकेनचा वापर करता यावा यासाठी कंपनी खरेदी करणार असल्याचं ट्विट मस्क यांनी केलं आहे.

कोका कोला कंपनी खरेदी करण्याच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर याविषयी अनेक प्रतिक्रिया उमटत असून कमेंटचा पाऊस पडत असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी काही काळापूर्वी ट्विटरमध्ये 9% हिस्सेदारी विकत घेतली होती. आता मस्क यांनी ट्विटर इंकचा 100% हिस्सा विकत घेतला आहे. त्यांनी ट्विटर कंपनी $54.20 प्रति शेअर या दराने विकत घेतली आहे.

ट्वीटरमध्ये आगामी काळात अनेक फीचर्स आणणार असल्याचे मस्क यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता एलाॅन मस्क कोका कोला कंपनी खरेदी कधी करणार? यात़े सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  मोठी बातमी ! ‘या’ नियम व अटींसह पार पडणार राज ठाकरेंची बहुचर्चित सभा

  मोठी बातमी! रशियाकडून युद्ध आणखी भडकवण्याचा इशारा, म्हणाले…

  Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर

  रियान परागने मिळवले दिग्गजांच्या पक्तींत स्थान; IPL मध्ये केला ‘हा’ पराक्रम

 “माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले