मोठी बातमी! अनिल देशमुखांची प्रकृती खालावली, व्हिलचेअरवरून जे.जे. रुग्णालयात दाखल

मुंबई | गेल्या सहा महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचं नाव आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर ईडीने त्यांना 5 वेळा समन्स बजावला होता. त्यानंतर अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. त्यावेळी त्यांना ईडीने अटक केली होती.

तुरूंगात असलेल्या अनिल देशमुखांना अनेकदा आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अशातच आता त्यांना मुंबईच्या जे.जे.रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जे.जे. रूग्णालयात दाखल करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. लिफ्टच्या समोरील परिसरातील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे.

पुर्णपणे पांढरे केस झालेले अनिल देशमुख पोलिसांच्या गराड्यासह रूग्णालयात दाखल झाले होते. व्हिलचेअरवरून अनिल देशमुख रूग्णालयात दाखल झाले होते.

अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसात ही शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाचा झटका

चीनने पुन्हा जगाचं टेंशन वाढवलं, अत्यंत धक्कादायक बातमी समोर 

“कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई पालिका जिंकू” 

सर्वात मोठी बातमी! HDFC ने केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा 

जिओचा धमाका प्लॅन; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत फ्री कॉलिंग आणि बरंच काही…