मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी 6 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीकडूून आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.
त्यातच आता पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना आता 15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
तसेच अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीकडन न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. ऋषिकेश देशमुख यांनी अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ऋषिकेेश देशमुख हे शुक्रवारी ईडीसमोर हजर राहिलेले नाहीत.
अनिल देशमुख यांना संशयित म्हणण्यात आले अन् बारा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुख यांना आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. ऋषिकेेश देशमुख यांनी़ अनिल देशमुखांसारखे आपल्यासोबत होईल, अशी भीती अर्जात व्यक्त केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी वसूलीचे टार्गेट दिलं होतं, असाही आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.
यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझेला मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. तसेच अनिल देशमुख यांचे खासगी सचिव सचिन पलांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती.
6 नोव्हेंबरला अनिल देशमुख यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालात हजर करण्यात आले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या कोठडीत 12 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली होती.
शुक्रवारी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी 15 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 3 दिवसांची वाढ करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांना जामीन मिळावा याकरिता त्यांचे वकिल इंदरपाल सिंग यांनी न्यायालयात युक्तीवाद केला होता. अनिल देशमुख हे ईडीला सहकार्य करत आहेत. त्यामुळे जामिन मिळावा , असा युक्तीवाद केला अशी माहिती समोर येत आहे.
ईडीच्या वकिलांनी अनिल देशमुख यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर देशमुख यांना अधिक कोठडी सुनावण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, परमबीर सिंह यांनी आरोप केल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने देखील अनिल देशमुख यांच्यावर मनीलाँड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण
“जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”
“कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, ओव्हर डोस घेऊन जास्त बोलतीये”
“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”
‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी