नवाब मलिकांचं टेन्शन वाढलं! सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दणका, आता…

मुंबई | मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता मलिकांना आजही सुप्रिम कोर्टानं दिलासा दिला नाही.

नवाब मलिक मनी लाॅर्डिंग प्रकरणी अद्यापही मलिकांना दिलासा मिळालेला नाहीये. अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. आज त्यावर सुनावणी झाली.

सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा मुक्काम तुर्तास तरी ऑर्थर रोड कारागृहातच राहणार आहे.

मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.

मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळातील वातावरण जोरदार पेटलं आहे. त्यामुळे सध्या मलिकांची खाती काढून घेतली आहेत.

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मनी लाॅर्डिंग प्रकरणात त्यांना ही अटक करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिकांवर झालेल्या ईडी कारवाईनंतर विरोधकांनी मलिकांना चांगलंच निशाण्यावर घेतलेलं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा काय बदल झाला

  रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार! समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण 

  ‘शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित….’; राऊतांचे भाजपला खडेबोल

 “राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”

  राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना