मुंबई | सध्या राज्यातील वातावरण अनेक मुद्द्यांनी तापलं आहे. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुंबईत दाखल झाले आहेत.
राणा दाम्पत्याला रोखण्यासाठी शिवसेना आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊसमध्ये राणा दाम्पत्याने बुकिंग केल्याची समजताच शिवसैनिक तेथे पोहचले आहेत.
मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार असल्याच्या राणा दाम्पत्याच्या निर्णयावर शिवसैनिकांनीही आक्रमक पवित्रा घेत त्यांना रोखण्याची रणनिती आखली.
राणा दाम्पत्य आणि संघटनेचे 500 ते 700 पदाधिकारी मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत हायहोल्टेड ड्रामा पहायला मिळणार, असं चित्र दिसत आहे.
राणा दाप्मत्यांमुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून मुंबईत पोलीस तैनात करण्यात आले आहे. प्रकरण चिघळलं जाऊ नये यासाठी मोठा पोलिसांचा ताफा तैनात आहे.
मुंबईत पोहचूनही अद्याप राणा दाम्पत्य मातोश्रीवर पोहटले नाहीत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
राणा दाम्यत्य यांचे मातोश्रीऐवजी अन्य ठिकाणी अचानक आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी घ्या असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा काय बदल झाला
रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार! समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण
‘शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित….’; राऊतांचे भाजपला खडेबोल
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या टुकडे टुकडे गँगला शरद पवारांनी आवरावं”
राज्यावर नवं संकट! मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना