मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणेने महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार देखील आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी याचे सुचक संकेत देखील दिले होते.
केंद्रीय यंत्रणेच्या कारवाईला जशाच तसं उत्तर देण्यासाठी आता ठाकरे सरकारने देखील पावलं उचलण्यास सुरूवात केली. अशातच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आता भाजपच्या एका नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
भाजप नेत्याच्या करेक्ट कार्यक्रमासाठी आता गृहखात्याकडून चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आता हा भाजपचा नेता कोण? हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. भाजपच्या नेत्यांवर गृहखातं कारवाई करत नसल्याची तक्रार शिवसेनेने केली.
शिवसेना नाराज असल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेतली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे.
त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांची पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे आजची ही दुसरी बैठक आहे. त्यामुळे आता भाजप नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या हे चार भाजप नेते महाविकास आघाडीच्या रडारवर असल्याची चर्चा आता होताना दिसत आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कारवाईची होणार शक्यता आहे.
दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यांवर कारवाई केली होती. तर संजय राऊत यांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई केली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडी भाजपला जशास तस उत्तर देण्यास तयार झाल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Anil Parab: “आता पुढचा नंबर अनिल परबांचा, त्यांनी लवकर बॅग भरावी”
Russia-Ukraine War: युद्धात मोठी घडामोड; ‘या’ शहरातून रशियन सैन्य अचानक माघारी फिरलं
“राष्ट्रवादीवर भरोसा ठेऊ नका, मातोश्रीवर कॅमेरे लागतील…”
Gold Silver Rate: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर
“मी पुन्हा येईन म्हणणंही एप्रिल फूलच”