मुंबई | एका जाहीर कार्यक्रमात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तलवार हातात घेतली होती. भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार हातात घेतल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांनी तलवार घेत सहभाग कार्यक्रमात सहभाग नोंदवला. दोन्हीही नेत्यांचे तलवारीसह फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मोहित कंबोज यांनी केलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांच्यावर तलवार घेऊन नाचल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आपण कोणत्याही सार्वजानिक ठिकाणी तलवार घेऊन नाचलो नाही. बांद्रा येथील कार्यक्रमात शीख समुदाय देखील उपस्थित होता. या शीख समुदायातील लोकांना तलवारी दिल्या, असं मंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात तलवारी काढल्याची आठवण अस्लम शेख यांनी करून दिली आहे. मात्र, आर्म्स अॅक्टनुसार दोन्हीही मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. मोहित कंबोज हे तलवार घेऊन नाचताना दिसले होते. तलवार घेऊन नाचण मोहित कंबोज यांच्याही अंगलट आलं होतं. मोहित कंबोज यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
“अडीच वर्षांत केवळ अपमान होणार असेल तर साहेबांनी विचार करायला हवा”
मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!
“काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार”
डिजीटल मीडिया पत्रकारिता पुरस्काराने ‘थोडक्यात’चा सन्मान; कृष्णा वर्पेंचा गौरव