मोठी बातमी! गुजरातमधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त

 गांधीनगर | सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर ड्रग्ज प्रकरण चांगलंच प्रकाशझोतात आलं. त्यानंतर एनसीबीनं अनेक ठिकाणी छापे टाकत ड्रग्ज प्रकरणं समोर आणली. त्यामुळे आता ड्रग्ज प्रकरणानं तर सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

गुजरातमध्ये पुन्हा एकदा ड्रग्जचा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील खंभालिया येथे 350 कोटी रुपयांचे 66 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्जसह हेराॅईनही जप्त करण्यात आलं आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी कारवाई केली आहे.

गुजरात पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. याचा ड्रग्ज प्रकरणाचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता गुजरातच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजायला सुरुवात झाली आहे.

द्वारका ड्रग्ज प्रकरणाला गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी आता याप्रकरणी शोध मोहिमेसाठी टीम तयार केली होती. आरोपींनी अमली पदार्थांचा पुरवठा कुठून केला, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

द्वारका ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांपैंकी एक भाजीविक्रेता आहे. देवभूमी द्वारका पोलिसांनी ही करवाई केली असून आरोपीकडे सापडलेल्या ड्रग्जची किंमत 88 कोटी 25 लाख इतकी आहे.

350 कोटी ड्रग्ज प्रकरणी सापडलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र आता याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडताना दिसत आहे.

यापूर्वीही गुजरातमध्ये ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर जवळपास 3 हजार किलो हेराॅईन जप्त करण्यात आलं होतं.  जवळपास 20 हजार कोटी रूपये किंमतीच्या या ड्रग्ज प्रकरणी अदानी समुहाकडून एक पत्रक काढून स्पष्टीकरण करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘काँग्रेसचं सरकार आल्यावर आम्ही…’; प्रियांका गांधींची मोठी घोषणा

“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात” 

“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली” 

मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’ 

‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत