मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

सध्या पूजा चव्हाण आ.त्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वर्तुळातील वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा देखील दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अखेर शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला असं मानलं जात आहे.

संजय राठोड हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. संजय राठोड आपला पदाचा राजीनामा देण्यासाठी पत्र घेऊनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थानी असलेल्य वर्षा निवास्थानी दाखल झाले होते आणि त्यांनी अखेर वनमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे.

‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात. त्यात मी दोषी आढळलो तर माझा राजीनामा मंजुर करा.’ अशी विनंती संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी संजय राठोड प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा घ्यावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम होते, अखेर त्यांनी संजय राठोड यांचा स्वीकारला आहे.

पूजा चव्हाण तरुणी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यातील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा संजय राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे खुद्द राठोड यांनीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या –

वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली!

‘कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर मला फोन कर’, सोहेल खानचा राखी सावंतला मदतीचा हात

महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, ‘या’ पोस्टनं चाहते चिंतीत

आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव…

जाणून घ्या! ओवा खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे