मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर

मुंबई | देशातली पहिल्या क्रमांकाची कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सध्या UPSC च्या निकालाची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. 2021 च्या UPSCच्या निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तीन स्थानांवर मुली आल्या आहेत.

श्रुती शर्माने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला आहेत.

निकालात राज्यातील पुण्याच्या शुभम भिसारेनं 97 वा क्रमांक पटकावला आहे. अक्षय वखारेनं 203 वा क्रमांक मिळवला आहे. तर ठाण्याच्या इशान टिपणीसने 248 वा क्रमांक पटकावला आहे.

अंतिम निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. यंदा एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले ‘मी माझे कपडे विकून लोकांना…’ 

‘घटनेच्या तीन तासांनंतर…’; अखेर सिद्धू मूसेवालाच्या हत्येचं कारण आलं समोर 

“राष्ट्रवादी हा शेजारच्या घरी पाळणा हलला की पेढे वाटणारा पक्ष” 

“पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार”