मुंबई | तुमचं खातं स्टेट बॅंक ऑफ इंडियात (SBI) असेल, तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे. सरकारी एजेंसी पीआयबीने एक एडवाइजरी जारी केली आहे.
ग्राहकांना त्यांचं बँक अकाउंट ब्लॉक केलं जाईल, असं मेसेज येत आहेत. अशा एसएमएस आणि कॉल्सला उत्तर देऊ नये, असं सरकारने म्हटलं आहे.
तुमचं एसबीआय बँक खातं ब्लॉक केलं जाईल, असा मेसेज फेक आहे. ट्विटमध्ये अशा बनावट मेसेजचा फोटो देखील शेअर करण्यात आला आहे, असं पीआयबीने ट्विट करत म्हटलंय.
खासगी अथवा बँकिंग माहिती शेअर करण्यास सांगणाऱ्या ईमेल/एसएमएसला उत्तर देऊ नये. जर तुम्हाला अशा प्रकारच मेसेज आल्यास त्वरित [email protected] वर रिपोर्ट करा, असं सरकारने बँकेच्या ग्राहकांना सावध करत म्हटलं आहे.
दरम्यान, बँकेच्या खातेधारकांना अशाप्रकारचा बनावट मेसेज येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावर्षी देखील मार्च महिन्यात एसबीआयने आपल्या ग्राहकांना सावध केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
पेट्रोल-डिझेल दर कपातीच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगी
झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सने सर्वांचं टेंशन वाढवलं, धक्कादायक माहिती समोर
“श्रीकृष्णरूपी देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने कंस मामाला गाडणार”