मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

मुंबई | गेल्या सहा महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे. 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुखांचं नाव आल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ईडीने वसुली प्रकरणात अनिल देशमुखांना अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांना खांद्याच्या दुखापतीमुळे जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यानंतर आता देशमुखांना आता रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. अशातच आता अनिल देशमुखांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. आर्थर रोड कारागृहातून अनिल देशमुखांना ताब्यात घेतलं आहे.

अनिल देशमुखांना त्यानंतर आता विशेष न्यायालात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीच्या तपासानंतर आता सीबीआय तपास करणार असल्याने नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जे.जे. रूग्णालयात दाखल करतानाचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यावेळी अनिल देशमुखांचं रूप आख्खंच पालटल्याचं पहायला मिळालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा…”, अजित पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

अजान, हनुमान चालीसा वादावर अनुराधा पौडवाल यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

“…म्हणून मी माझ्या प्रभागात हनुमान चालीसाचे भोंगे लावणार नाही” 

“…यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय ही लढाई थांबणार नाही”