Top news देश

बाबो! सोन्या-चांदीच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

नवी दिल्ली | अलिकडच्या काही वर्षांमध्ये सोन्याची मा.गणी प्र.चंड वाढली आहे. यामुळे सोन्याचे भा.व देखील गगनाला भि.डले आहेत. सोनं खरेदी करणे हे सामान्य नागरिकांच्या आ.वाक्याबाहेरचं झालं आहे. अलीकडे सोनं 50 हजार रुपये प्रती तोळ्याच्या आसपास राहत आहे.

गेलॆ दोन दिवस एमसीएक्सवर सोन्याचे दर स्थिर होते. मात्र, काल दुपारनंतर एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचे दर 330 रुपयांनी वाढून 46 हजार 460 रुपये प्रती तोळा ईतके झाले. आज या दरात 10 रुपयांची वाढ होवून सध्या मसीएक्सवर सोन्याचा दर 46 हजार 460 रुपये प्रती तोळा इतका आहे.

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात देखील आज मोठी वाढ पहायला मिळाली आहे. काल एमसीएक्सवर चांदीचे दर 69 हजार 200 रुपये प्रती किलो इतके होते. आज या दरात तब्बल 1300 रुपयांची वाढ होऊन चांदी 70 हजार 500 रुपये प्रती किलो झाली आहे.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरील लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

अबब…दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले!

जाणून घ्या आजचे राशीभविष्य; ‘या’ राशीच्या लोकांसाठी आहे खूपच उत्तम दिवस

कचरावेचक भावांच्या ‘या’ कलेवर आनंद महिंद्रा फिदा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…