मोठी बातमी! गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या गाडीचा भीषण अपघात; तातडीने रूग्णालयात हलवलं

सांगली | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.

ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह आणखी तीनजण या अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर छोटा हत्ती चालक देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा-कुंडल रोडवर हा अपघात झाला. ब्रम्हानंद पडळकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

कार्यकर्त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी जात असताना हा अपघात झाला. ब्रम्हानंद यांची गाडी आणि पिकअप गाडी दोन्ही चक्काचूर झाल्याचं पहायला मिळत आहे.

अपघात झाल्यानंतर जखमींना जवळच्या रूग्णालयात हलवण्यात आलं आणि विटा पोलिस निरीक्षक आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर गोपीचंद पडळकर यांनी आपला सातारा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले आहे. लवकरच ते पोहचतील, अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ‘इतक्या’ लाखांची मदत जाहीर; भव्य सत्कार करणार

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘तुम्हाला बजावून सांगतोय की…’; अमित शहांवर प्रकाश राज भडकले

जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाने खळबळ, म्हणाले ‘शरद पवार साहेबांना….’ 

थेट युक्रेनमध्ये पोहोचले ब्रिटेनचे पंतप्रधान; झेलेंस्कींसोबत रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल