MPSC उमेदवारांसाठी खुशखबर! ‘या’ विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई | कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी एक वर्ष वयोमर्यादा वाढवून देण्याची वारंवार मागणी केली होती.

आता राज्य सरकारकडून विद्यार्थांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एक वर्ष वाढीव मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अनेक दिवस परीक्षेची घोषणा करण्यात येत नव्हती. मेहनतीेने परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी परीक्षेला मुकणार होते. आता या विद्यार्थांना एक वर्ष वय अधिक वाढवून दिल्याने दिलासा मिळाला आहे.

येत्या 19 नोव्हेंबर रोजा अर्ज भरण्याच्या शेवटची मुदत असणाऱ्या परीक्षेकरिता हा निर्णय लागू असणार आहे. राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकात मागणी केल्याचं सांगितलं होतं.

कोरोनाकाळात राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा न झाल्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थांना संधी मिळावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली होती. 13 ऑक्टोबरला अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात मागणी केली होती.

बुधवारी अशोक चव्हाण यांनी राज्य लोकसेवा आयोग आणि निवड मंडळाच्या परीक्षांसाठी विद्यार्थांना वयोमर्यादा वाढवून दिली, असं अशोक चव्हाण यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे आभार करणार ट्विट केलं आहे.

विदयार्थांना एक वर्ष वयोमर्यादा वाढवून द्यावी की नाही याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी एक वर्ष वाढीव देण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे वय संपलेल्या विद्यार्थांना एक संधी मिळणार आहे.

‘वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थांना या निर्णयाचा फायदा होणार आहे’, असं राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोरोना पार्दुभावाचा सर्वच क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे.

ग्रामीण भागातून शहरात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना मोठा फटका बसला होता. आता त्यांना थोडाफार दिलासा मिळणार असल्याचं दिसतयं.

दरम्यान, यापुर्वी एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांनी परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या- 

राज्यभर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; ‘या’ 11 जिल्ह्यांना अलर्ट जारी

“…तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, बायकापोरांसह सगळे मुंबईत या”

“डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलोय”

 एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरुन गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर निशाणा, म्हणाले…

  ‘…ते प्रकरण मुख्यमंत्री कार्यालयातून फोन करुन दाबण्यात आलं’; मलिकांचा फडणवीसांवर गंभीर आरोप