मुंबई | राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आपल्या आमदारांना सुरक्षित ठेऊन अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक ट्रायडंटवर पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.
या बैठकीनंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचं राज्यसभा निवडणुकीसाठीचं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार जेलमध्ये आहेत.
कोठडीत असूनही ते राज्यसभेसाठी मतदान करु शकतील, असा अंदाज बांधला जात होता. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी कोर्टात मतदान करता यावं, यासाठी अर्जही दाखल केला होता. या दोन्ही नेत्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येण्याची शक्यता फार कमी आहे.
दरम्यान, दोन्ही आमदारांना मतदान करता आलं नाहीतर आघाडीतं मतांचं गणित बिघडण्याची शक्यता आहे. आता कोर्ट दोघांच्या जामीनाबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद पैगंबरांवरील टीकेमुळे सुरू झालेल्या वादात कंगणाची उडी, म्हणाली…
महिन्याला 1000 रूपयांची गुंतवणूक करून 2 कोटी जमवा, जाणून घ्या भन्नाट योजना
“बंगालमध्ये दीदींनी जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीये”
…तर शुगर राहिल कंट्रोलमध्ये; डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
राज्यातील आमदार मुक्कामी असलेल्या हॉटेल्सचा एका माणसाचा दिवसाचा खर्च आहे ‘इतका’