Top news मनोरंजन

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! आता सुशांतचा मित्र संदीप सिंहनं उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. सुशांतच्या मृ.त्यूचा वेगानं आणि योग्य तपास केला जावा यासाठी देशभरातील लोक मागणी करू लागले. मुंबई आणि बिहार पोलीसांनंतर सीबीआय, ईडी आणि एनसीबी सारख्या देशातील तीन उच्च दर्जाच्या एजन्सी याप्रकरणी शोध घेऊ लागल्या.

सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच अनेक लोकांवर सोशल मीडियावर गंभीर आरोप करण्यात आले. सुशांतच्या निकट वर्तियांवर देखील सुशांत प्रकरणी बरेच आरोप करण्यात आले. सुशांत सिंह राजपूतचा अगदी जवळचा मित्र संदीप सिंह याच्यावर देखील अनेकांनी आरोप केले. मात्र, आता विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर संदीप सिंहनं कारवाई केली आहे.

संदीप सिंह यानं ‘रिपब्लिक टीव्ही’ आणि रिपब्लिकचे कर्ता धर्ता अर्नब गोस्वामी यांच्यावर मा.नहानीचा गु.न्हा दाखल केला आहे. विनाकारण बदनामी केल्याचं कारण देत संदीप सिंहनं रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याकडून 200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. तसेच चॅनेलच्या फायद्यासाठी अर्णबने खोटी बातमी केल्याचा आरोपही संदीपनं केला आहे.

संदीप सिंहनं या संपूर्ण खटल्याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून दिली आहे. संदीपनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक नोटीस शेअर केली आहे. चॅनेलच्या फायद्यासाठी संदीपची प्रतिमा कलंकित केल्याचा आरोप, संदीपनं या नोटीसमध्ये रिपब्लिक टीव्हीवर केला आहे.

या नोटीसमध्ये असं म्हटलं आहे की, रिपब्लिक टीव्हीनं सुशांत बद्दल कोणतेही ठोस पुरावे न ठेवता संदीपवर मुद्दाम गंभीर आरोप केले आहेत. तसेच या वाहिनीनं मुंबई पोलीस आणि सीबीआयच्या बातम्या चालवून मुद्दाम दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. संदीप सिंहच्या बातम्या चॅनेलवर तोपर्यंत चालवल्या जातील जोपर्यंत संदीपच्या बातम्या चॅनेलला काही फायदा मिळवून देणार नाहीत, अशी माहिती रिपब्लिकच्या एका व्यक्तीनं दिली आहे.

अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या या चॅनेलनं संदीपची प्रतिमा खराब केली आहे. यामुळे त्यांनी 200 कोटींची नुकसान भरपाई करावी. तसेच अर्णब यांनी माफी मागावी, अशीही मागणी संदीप सिंहनं नोटीसमध्ये केली आहे.

दरम्यान, सुशांतच्या मृ.त्यूच्या काही दिवस अगोदरच सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सॅलीयनचा मृ.त्यू झाला होता. सुरुवातीपासून दिशाच्या मृ.त्यूचा सुशांतच्या मृ.त्यूशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. यामुळे सीबीआय सुशांतच्या मृ.त्यूचा दिशाच्या मृ.त्यूशी संबंध आहे का याचा शोध लावण्याचा प्रयत्न करत आहे.

सीबीआयनं सुशांतच्या मृ.त्युचा तपास दिशाच्या अँगलनं सुरू केला आहे. याच तपासासाठी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिशाचा कथित प्रियकर रोहन रॉय याच्या घरी धाड टाकली आहे. सुशांत आणि दिशाच्या मृ.त्यू प्रकरणी शोध घेण्यासाठी सीबीआयनं दिशाच्या जवळच्या लोकांची चौकशी केली आहे.

 

View this post on Instagram

 

It’s Payback time @republicworld #Defamation #EnoughIsEnough

A post shared by Sandip Ssingh (@officialsandipssingh) on


महत्त्वाच्या बातम्या-

आता भाजपचा ‘हा’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर? राजकीय चर्चेला उधाण

रोहन रॉय सुशांतच्या मृ.त्यूला जबाबदार? सीबीआयची मोठी कारवाई!

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी सोडलं मौन म्हणाले…

धक्कादायक! सुशांत प्रकरणी ‘ते’ वृत्त चुकीचे; सीबीआयने दिले स्पष्टीकरण

अनुरागवर लैं.गिक छ.ळाचा आरोप करणारी पायल ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…