मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुशांत प्रकरणी सुरुवातीपासूनच वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. सुशांत प्रकरणी बरेच लोक रोज नवनविन गोष्टींचा खुलासा करत आहेत. अशातच आता सुशांतचा फार्म हाऊस मॅनेजर रईस यानं एका वृत्त वाहिनीशी बोलताना अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत.
सुशांतच्या फार्महाऊसवर अनेकवेळा पार्ट्यांच आयोजन केलं जायचं. या पार्ट्यांना बॉलिवूड इंडस्ट्री मधील बरेच लोक उपस्थित असायचे. फार्महाऊस वरील या पार्ट्यांना रिया चक्रवर्ती एप्रिल महिन्यामध्ये येवू लागली होती. मात्र, रियापूर्वी सारा अली खान पार्ट्यांना येत होती. सारा अली खान फार्महाऊस वरील पार्ट्यांना येणं बंद झाल्यानंतर रिया पार्ट्यांना येवू लागली होती, अशी माहिती सुशांतचा मॅनेजर रईसनं दिली आहे. तसेच रईसनं इतरही काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
सुशांतला मी कधी ड्र.ग्ज घेताना पाहिलं नव्हतं. मात्र, सुशांतच्या फार्महाऊसवर ज्या पार्ट्या आयोजित केल्या जायच्या त्या पार्ट्यांना स्मो.किंग पेपर मागवले जात होते. हे पेपर कशासाठी मागवले जात होते याबद्दल मला काहीही माहित नाही, अशी माहिती रईसनं दिली आहे.
तसेच एप्रिल महिन्यात सुशांतच्या फार्महाऊसवर रियाचं येणं जाणं चालू झालं होतं. 31 एप्रिलला फार्म हाऊसवर सुशांतनं बर्थडे पार्टी ठेवली होती. या पार्टीला रियाचे आईवडीलही उपस्थित होते, अशी माहितीही रईसनं दिली आहे.
दरम्यान, सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. रिया चक्रवर्तीची सलग तीन दिवस चौकशी केल्यानंतर एनसीबीनं रियाला ताब्यात घेतलं आहे. न्यायालयानं रियाला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
तसेच एनसीबीनं रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह इतरही काही जणांना ताब्यात घेतलं आहे. रियानं एनसीबीच्या चौकशी दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीमधील 25 ‘ए’ लिस्टर्स सेलेब्रिटीची नावे सांगितली आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात बॉलिवूड मधील अनेक दिग्गज लोक एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सुशांतच्या मॅनेजरचा धक्कादायक खुलासा! सुशांतनं मृ.त्युच्या एक दिवस अगोदर केली होती ‘ही’ गोष्ट
ऐकावं ते नवलंच! कुत्र्यांमध्ये भांडण झाल्यानं ‘या’ अभिनेत्यानं पत्नीला दिला घटस्फोट
धक्कादायक! रिया आणि सुशांतनं ड्र.ग्ज वेळेत मिळावेत म्हणून ‘ही’ गोष्ट केली होती
झोपडीत राहात होती मुलगी, पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC परीक्षा!
सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा