मोठी बातमी! बाॅलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, ‘या’ बड्या कलाकारांवर होणार कारवाई

सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्यानं चर्चेत असलेल्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केलं. ही कारवाई फँटम फिल्म्सशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्यातल्या अनेक ठिकाणी आयकर विभागाची पथकं छापे टाकत आहेत. या छापेमारीतून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.

इन्कम टॅक्स विभागाने बॉलिवूडमधील काही महत्त्वाच्या कलाकार आणि दिग्दर्शकांवर धाड टाकल्याची माहिती समोर येते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तापसी पन्नू अनुराग कश्यप विकास बहल यांच्या विविध ठिकाणांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे.

बुधवारी दुपारी आयकर विभागाने अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे टाकले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले आहेत.

अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि तापसी पन्नूनं मोठ्या प्रमाणात आयकर भरला नसल्याचा संशय केंद्रीय यंत्रणेला आहे. त्यामुळेच या कलाकारांशी संबंधित मुंबई आणि मुंबई बाहेरील ठिकाणांवर धाडसत्र सुरू आहे. या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.

दरम्यान, अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला. विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं २०१८ मध्ये त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली होती. फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…

श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…

भारतीय संघातील ‘हा’ वेगवान गोलंदाज लवकरच बांधणार लग्नगाठ

अभिनेत्री कंगना राणैतची सर्वोच्च न्यायालयात धाव, म्हणाली….

वारंवार चेहरा धुवूनही त्वचा तेलकट राहतेय? मग तुमच्या तेलकट त्वचेसाठी करा ‘हे’ घरगुती उपाय