रोहित शर्मा भारताचा नवा कर्णधार; आयपीएलमध्ये झळकलेल्या ‘या’ चार युवा खेळाडूंची संघात वर्णी

मुंबई | सध्या चालू असलेल्या टी-ट्वेंटी विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान सुंपुष्टात आलं आहे. सर्वप्रथम पाकिस्तान आणि त्यानंतर  न्यूझीलंडसमोर झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर भारतीय संघ आता स्पर्धेबाहेर गेला आहे.

विश्वचषकातून बाहेर गेल्यानंतर आता विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडविरूद्ध भारतीय संघ भारताच्या स्टार सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यामुळे आता नव्या कर्णधाराच्या चर्चांना आता फुल्ल स्टाॅप लागला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी टी-ट्वेंटी मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने 16 सदस्यीय संघाची निवड केली आहे. भारत न्यूझीलंडविरूद्ध 17 नोव्हेंबरपासून 3 टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे.

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर या फलंदाजांच्या खांद्यावर फलंदाजीची जबाबदारी आहे.

युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे.

पहिला टी-ट्वेंटी सामना 18 नोव्हेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. तर दूसरा टी-ट्वेंटी  19 नोव्हेंबरला रांचीमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर  तिसरा टी-ट्वेंटी 21 नोव्हेंबरला कोलकात्यामध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर केएल राहुल भारताचा उपकर्णधार असणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नुकताच आयपीएलमध्ये धमाका करणारा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.त्याचसोबत कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा आक्रमक फलंदाज व्यंकटेश अय्यरला देखील भारतीय संघात संधी मिळाली आहे.

तर दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज आवेश खान आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेल हे दोन युवा गोलंदाज देखील भारतीय संघात असणार आहेत.

दरम्यान, न्यूझीलंड विरूद्धटच्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन, माजी कर्णधार विराट कोहली आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

बहुप्रतिक्षित ‘Maruti Suzuki Celerio’ उद्या बाजारात धडकणार; जाणून घ्या किंमत

खवय्यांना महागाईचा दणका! हाॅटेलचं जेवण तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी महागणार

“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”

“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”

‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट