‘2020 संपण्यापूर्वीच…’; सीरमच्या आदर पुनावाला यांच्याकडून कोरोना लसीबाबत मोठी घोषणा

पुणे | जवळपास वर्षभरापूर्वीपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. भारत देशाला देखील या महामारीचा फटका चांगलाच बसला आहे. कोरोना महामारीमुळे लोकांचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे. या महामारीवर लस केहा मिळणार या एका गोष्टीकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

अशातच आता कोरोना लसीविषयी सिरम इंस्टीट्युटचे प्रमुख आदर पूनावाला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सर्वांना दिलेल्या शब्दानुसार, 2020 संपण्यापूर्वी कोव्हिडशिल्डच्या आपत्कालीन वापरास परवानगी मागितली आहे. सिरम इंस्टीट्युटने ‘कोव्हीशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी अर्ज केला आहे, अशी माहिती पूनावाला यांनी दिली आहे.  तसेच पुनावाला यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे देखील आभार मानले आहेत.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इंस्टीट्युटला भेट दिली होती. यावेळी मोदी यांनी कोरोना लसीची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली होती.

मोदिजींच्या भेटीनंतर पुनावाला यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी देखील पुनावाला यांनी लसी संदर्भात बरीच महत्वाची माहिती दिली होती. पुनावाला यांनी लवकरंच कोरनावरील लस सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत उपलब्ध होईल, अशी मोठी घोषणा त्यावेळी केली होती.

आदर पुनावाला यावेळी म्हणाले होते की, नरेंद्र मोदी यांच्याशी आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली आहे. त्यांना कोव्हीशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. लसीची पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत मोदिजी समाधानी आहेत.

सध्या कोव्हीशिल्ड लसीच्या तिसऱ्या चाचणीवर आमचे लक्ष आहे. लोकांपर्यंत लस लवकर पोहचवण्यासाठी संपूर्ण तयारी केली जात आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोसेस उपलब्ध करून दिले जातील, अशीही माहिती आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

तसेच आम्ही बनवलेली ही लस संपूर्ण सुरक्षित आहे. ही लस घेतलेल्या स्वयंसेवकांमधील एकही स्वयंसेवक अद्याप रुग्णालयात दाखल झालेला नाही. लस घेतलेल्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती वाढत असून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता 60 टक्क्यांनी कमी झाली आहे, असंही पुनावाला यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाने ‘या’ कारणामुळे सुशांत सोबत काम करण्यास दिला होता नकार; वाचा सविस्तर

मुलाखतीतील ‘या’ एका उत्तरामुळे नेहा बॅनर्जी झाली पहिल्याच प्रयत्नात IAS

डॉ. शितल आमटे प्रकरणाचा घातपाताच्या दिशेने तपास, पोलिसांनी तब्बल ‘इतक्या’ जणांचे जबाब नोंदविले

अर्णव गोस्वामिंच्या अडचणीत वाढ! ‘या’ पुराव्यांसह 1914 पानांचं आरोपपत्र दाखल करत रायगड पोलिसांची मोठी कारवाई

कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल, सोशल मिडीयावर झाली प्रचंड ट्रोल; पहा व्हिडिओ