मुंबई | मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त दरवर्षी कला क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. अशातच आता प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना यंदाचा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अशातच या वर्षांपासून एक विशेष पुरस्काराची सुरूवात करण्यात आली आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने हा पुरस्कार सुरू करण्यात आलाय. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, असं या पुरस्काराचं नाव असणार आहे.
भारतरत्न लता मंगेशकरांच्या निधनानंतर पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. दरवर्षी 24 एप्रिलला पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
देशासाठी अत्यंत महत्वाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पहिला पुरस्कार पंतप्रधान मोदींना जाहीर झाल्यानंतर आता खुद्द मोदी हा पुरस्कार स्विकारण्यासाठी येणार असल्याची माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे.
दरम्यान, सिनेक्षेत्रात योगदान दिल्याबद्दल जॅकी श्रॉफ यांना देखील पुरस्कार देण्यात येणार आहे. तर संजय छाया या नाटकाला दीनानाथ मंदेशकर पुररस्कार घोषित करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या; कोर्टाने पुन्हा पोलीस कोठडी सुनावली
“राजभवनाचे बँक खाते नव्हते म्हणून…”; सोमय्यांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा