मोठी बातमी! बीड जिल्ह्यात ‘इतके’ दिवस लॉकडाऊन जाहीर

बीड |  गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसतं आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. तरीदेखील कोरोना आटोक्यात येत नाहीय.

याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. हे लॉकाडाऊन 26 मार्च ते 4 एप्रिल म्हणजेच बीड जिल्ह्यात 10 दिवसं लॉकडॉऊन असणार आहे.

कोरोना रुग्णांची संख्या बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवाचं उपलब्ध असणार आहे. यामध्ये किराणा दुकान, दूध विक्री, मेडिकल सेवा, खासगी आणि सार्वजनिक सेवा सुरु असणार आहेत. या सेवा या कालावधीमध्ये चोवीस तास सुरु असणार आहेत.

तसेच या लॉकडाऊनच्या काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कार्यालये, मंगल कार्यालय बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे हॉटेलही बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नांदेड जिल्ह्यातही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल रोजीपर्यंत म्हणजेच अकरा दिवस हा लॉकडाऊन असणार आहे.

तसेच मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मराठवाडा या भागातही कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

दरम्यान,  केंद्र सरकारने जिल्हा स्तरावर निर्बंध लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य स्तरावर लॉकडाऊन करता येणार नसल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील केंद्राने 23 मार्च रोजी नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमावली 30 एप्रिलपर्यंत लागू असेल, असं केंद्राने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलतं…

आज मध्यरात्रीपासून ‘या’ जिल्ह्यात 11 दिवसांचं…

थॉयरॉईडमुळं वजन वाढतंय, मग घ्या ‘ही’ काळजी

“काही झालं तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 5 वर्षे…

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी मागितली…