नागपूर | मागिल काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. मात्र फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रोगाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागपूर शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आजपासून ते 21 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे ठिक-ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
आजपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हेरायटी चौकात जाऊन लॉकडाऊनचा आढावा घेतला. त्यावेळी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नागपूर शहरातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
नागपूर शहरात अडीच हाजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच दुचाकीवर फिरणाऱ्या आणि फोर व्हिलरमध्ये दोन पेक्षा जास्त लोक असल्यास त्यांची वाहन जप्त करण्यात येणार आहे. तसेच जे व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना बोलावून समजवण्यात येणार असल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे.
त्याचबरोबर जो कोणी लॉकडाऊनच्या नियमाचं पालन करणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही आयुक्तांनी सांगितलं आहे. या दरम्यान रात्री 74 ठीकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. विमान, रेल्वे प्रवाशांना शहरात प्रवश करण्यासाठी त्यांना तिकीट दाखवावी लागणार. कारण नसताना शहरात येणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संदर्भात एक व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर शेअर केला आहे. त्यात घरी सुरक्षित रहा. अवश्यक नसल्यास घरातून बाहेर पडू नका. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा, असं आवाहन नागपूर पोलिस आयुक्तांनी दिलं आहे. त्याचप्रमाणे नागपूर पोलिस सदैव आपल्या सुरक्षिततेसाठी तत्पर आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
मा पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे नागपूरकरांसाठी आवाहन.
घरी रहा, सुरक्षित रहा.
प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा.
नागपूर पोलीस आपल्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. @nagpurcp pic.twitter.com/odrE8ymHZ7— Nagpur City Police (@NagpurPolice) March 15, 2021
महत्वाच्या बातम्या-
भाजपचे माजी आमदार संभाजी पवार काळाच्या पडद्याआड
“सचिन वाझे यांना अटक करुन महाराष्ट्र पोलिस दलाचा अपमान केला”
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यावर जिवघेणा ह.ल्ला, प्रकृती गंभीर!
“कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून ठाकरे मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत”
महेंद्रसिंग धोनीने सांसारिक मोह मायेपासून संन्यास घेतला? फोटो व्हायरल