मोठी बातमी! राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू

मुंबई | मागील काही महिन्यात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लावण्यात आली होती. अशातच आता ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीच्या सुचना दिल्या आहेत.

देशात सध्या ओमिक्राॅन रूग्णसंख्येने 300 चा आकडा पार केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाल्याचं दिसतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलवली होती.

या उच्च स्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी राज्यातील कोरोना रूग्णसंख्येचा आणि राज्यांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी काही सुचना देखील दिल्या होत्या.

नाताळ  आणि ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी जाहीर करण्यात आली आहे.

संसदिय कार्यमंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत ही घोषणा केली आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्ससोबत बैठक बोलावली होती. त्यावेळी हा निर्णय झाल्याचं समजतंय.

लग्न समारंभासाठी बंदीस्त सभागृहांमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी असणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे.

काल विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचक वक्तव्य केलं होतं. केंद्र सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याच्या सुचना केल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

“2 वर्ष झोपा काढल्या का? मी सरकारला पुन्हा एकदा सांगतोय…”

 दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…

‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा

 रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा