मोठी बातमी! मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी ‘या’ व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई |  दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळत आहे.

अशातच मोहन डेलकर यांच्या आ.त्मह.त्या प्रकरणी दादर व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत मुंबईमध्ये पोलिस स्टेशनमध्ये गु.न्हा दाखल करण्यात आहे. ही सगळी माहिती आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितली आहे.

मोहन डेलकर यांनी आ.त्मह.त्या केल्यानंतर घटनास्थळावरुन सुसाईड नोट जप्त करण्यासाठी आली होती. त्यामध्ये भाजपच्या काही नेत्यांची नावं असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी मोहन डेलकर यांच्या आ.त्मह.त्येची चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती.

सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये प्रफुल्ल खोडा पटेल यांचे नाव असल्याची माहिती समोर येत होती. तेसच प्रफुल्ल खोडा पटेल यांच्याकडून मोहन डेलकर यांना मानसिक त्रा.स देण्यात आल्याचाही आ.रोप त्यांच्यावर करण्यात येत होता.

न्यायाची मागणी करत मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.  त्यांनी मोहन डेलकर यांच्या आ.त्मह.त्येप्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. तसेच आम्हाला केंद्र सरकारने मदर केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारवरच आमचा पूर्ण विश्वास आहे, अशीअपेक्षाही  मोहन डेलकर यांच्या मुलाने केली होती.

दरम्यान, मोहनभाई डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. डेलकर यांचे वय 58 वर्ष इतके होते. मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये मोहनभाई डेलकर यांचा मृ.तदेह आढळला आला होता.

तसेच मोहन डेलकर यांनी 1985 मध्ये आदिवासी संघटनेची स्थापणा केली होती. 1989 मध्ये दादरा नगर हवेलीतून ते प्रथम अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर डेलकर यांनी अनेकवेळा पक्षांतर करत निवडणूक लढवली आणि खासदार म्हणून निवडून आले.

महत्वाच्या बातम्या-

जसप्रीत बुमरा होणार पुण्याचा जावई; पाहा कोण आहे त्याची होणारी बायको!

चमकदार आणि तजेलदार त्वचेसाठी करा ‘या’ गोष्टीचे सेवन

स्त्री होण्यासाठी पुरुष करतायेत लिंग बदल; ‘या’ शहरात लिंग परिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

संजना गणेशनसोबत लग्नाची चर्चा सुरू असताना व्हायरल होतोय बुमराहचा ‘हा’ व्हिडीओ! पाहा व्हिडीओ

“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचा घात केला आहे”