मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

वेळेआधीच मान्सून धडकणार असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा आहे. याशिवाय भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होणार आहे.

केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे. मान्सूनच्या आगमनानं सर्व आनंदीत झाले आहेत.

दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये आगमन करेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. मात्र वेळेआधीच मान्सूननं केरळमध्ये हजेरी लावल्याचं पहायला मिळत आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो. त्या अंदाजानुसार मान्सून महाराष्ट्रात 7 ते 8 जूनपर्यंत दाखल होऊ शकतो.

येत्या तीन ते चार दिवसात ईशान्य भारतातील काही राज्यात देखील मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये आज मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील दोन आठवडे मान्सूचा वेग कमी राहू शकतो, असं देखील हवामान विभागानं सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

  “आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”

  “धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे….”

  मोठी बातमी ! ‘या’ कारणामुळे राणा दाम्पत्यांसह 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

  ‘या’ ठिकाणी आढळला कोरोना नवा व्हेरियंट, 7 जण बाधित

  अखेर ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांकडून दिलगिरी व्यक्त