मोठी बातमी ! नारायण राणेंच्या अडचणींत पुन्हा वाढ, समोर आली ‘ही’ माहिती

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहुतील अधिश बंगल्यावरुन वातावरण गरम झालेलं आहे.

अधिश बंगल्यावरुन नारायण राणें अडचणींत सापडलेले आहेत. अशातच आता राणेंच्या अडचणींत वाढ झाली आहे.

मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिश बंगल्याविषयी नारायण राणेंना नोटीस बजावली आहे.

नारायण राणेंना पुन्हा नोटीस बजावत 10 जूनला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढतच चालल्याचं दिसत आहे.

अधिश बंगल्याच्या बांधकामात काही अटींचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे 10 तारखेला उपस्थित न झाल्यास पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही”

  कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा!

  “देवेंद्र फडणवीस गैरसमज झाले असतील तर…”

  मोठी बातमी | अखेर UPSC 2021 चा निकाल जाहीर

  Gold Rate | सोनं-चांदीच्या दरात इतक्या रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर