मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद

मुंबई | ओमिक्रॉन विषाणूच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर देशात खबरदारी घेतली जात आहे. अनेक राज्यांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यातच आता खबरदारी म्हणून अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. (1st to 8th Standard School offline classes closed )

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्या वाढली आहे. काल रूग्णसंख्या तब्बल 12 हजाराने वाढलेली पहायला मिळाली. तर ओमिक्राॅन रूग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काल मुंबईत 7 हजारहून अधिक रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता मुंबई आरोग्याच्या बाबतीत हाय अलर्टवर आहे.

अशातच आता मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा  बंद करण्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 31 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी हा निर्णय घेतला आहे.

शाळा ऑफलाईन पद्धतीने बंद करण्यात आल्या असल्या तरी ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू असणार आहेत. मुंबईत शाळा बंद करण्यात आल्याने आता राज्यातील इतर शहरात देखील शाळा बंद होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शाळांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत आहे, त्याच दृष्टीने आम्ही विचार करू, असं सुचक वक्तव्य राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यामुळे आता राज्यातील शाळा बंद होण्याची देखील शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!

“…तर भारताचा पाकिस्तान करायला वेळ लावणार नाही”