मुंबई | ‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू गुरूवार 2 सप्टेंबर रोजी झाला. त्याचा मृत्यू झाला ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
परंतू आता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यु प्रकरणाला आता एक वेगळंच वळण आलं आहे. मुंबई पोलिसांनी सिद्धार्थ मृत्यू प्रकरणी एक अपघाती गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येतं आहे. सिद्धार्थचा मृत्यू होण्याआधी म्हणजेच आधल्या रात्री म्हणजेच 1 सप्टेंबरच्या रात्री सिद्धार्थ त्याची बीएमडब्लू गाडी घेऊन बाहेर गेला होता.
ज्यावेळी तो घरी आला त्यावेळी त्याच्या गाडीची मागच्या बाजूची हेडलाईट फुटली होती. त्याच्या गाडीची अवस्था पाहून अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
सिद्धार्थचं कोणाशी भांडण झालं होत का?, त्या रात्री नेमकं काय घडलं असेल? असे अनेक प्रकारचे प्रश्न केले जात आहेत. मृत्यूच्या आधल्या रात्री त्याने काही औषध घेतली होती. त्यानंतर तो झोपायला गेला. मात्र तो सकाळी उठू शकला नाही. हे कळातच त्याला मुंबईमधील रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं.
रूग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आला असल्यानं त्यांनी सांगितलं होतं.
परंतू सिद्धार्थचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं होऊ शकत नाही, असं सिद्धार्थचा जिम ट्रेनर सोनू चौरसिया यांनी म्हटलं आहे. ते एका न्यूज चॅनेलला मुलाखत देताना बोलत होते. सोनू यांच्या या खळबळजनक दाव्यामुळं अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, सिद्धार्थच्या मृत्यूमुळं केवळ बॉलिवूड नाहीतर टीव्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीलाही मोठा धोका बसला आहे. अनेक अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवरून सिद्धार्थबद्दल लिहीलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
पाण्यात उडी मारायला गेला अन्…, पाहा काळजाचं पाणी करणारा व्हिडीओ
‘सिद्धार्थचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे होऊ शकत नाही’, सिद्धार्थच्या जिम ट्रेनरचा खळबळजनक दावा
अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर आज होणार अंत्यसंस्कार
चक्क कुत्रा गेलाय पैसे आणि पिशवी घेऊन भाजी मंडईत, पाहा व्हिडीओ