मोठी बातमी! राणा दाम्पत्यांना पोलिसांकडून नोटीस जारी

मुंबई | राज्यात भोंग्यावरुन आणि हनुमान चालीसा पठनावरुन राजकीय वातावरण पेटलं आहे. मुंबईत आज जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे.

भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार होते. त्यामुळे राज्यातील वातावरण गरम झालं.

राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालीसा पठनाच्या इशाऱ्यानं सकाळपासून मुंबईत शिवसैनिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहे.

मुंबईत कोणाताही राडा होऊ नये यासाठी आता खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नंदगिरी गेस्टहाऊसवर राणा दाम्पत्य असल्याच्या माहितीवरून गेस्ट हाऊसबाहेर शिवसैनिकांनी जोरदार ताफा जमवला आहे.

आता खार पोलिसांनी राणा दाम्पत्यांना 149ची नोटीस बजावल्यानंतर आता रवी राणा पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राणा दाम्पत्य विमाने मुंबईत दाखल झाले असून थोड्याच वेळात आमदार रवी राणा पत्रकार परिषद घेणार असून आपली भूमिका मांडणार आहेत.

मुंबईत कायदा आणि युव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं कुठलंही काम करु नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड फिल्मस्टार लागतात”

  “बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर पोहोचू द्या, हे लोक…”

  मोठी बातमी! राणा दाम्पत्यांमुळे मुंबईत मोठा ड्रामा, शिवसेना आक्रमक 

  Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, पाहा काय बदल झाला

  रशिया-युक्रेन युद्ध आणखी पेटणार! समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण