मुुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे अयोध्या दौरा स्थगित करण्यात आलाय.
राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेमध्ये बोलताना येत्या 1 तारखेला हिप बोनची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती.
शस्त्रक्रियेमुळे त्यांना आराम करावा लागणार असल्यानं हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. अशातच राज यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
आज राज ठाकरे यांनी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे.
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांना दोन महिने आराम करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना सक्तीनं विश्रांती घ्यावी लागणार आहे.
मी खरंतर बॅडमिंटन खेळणारा, क्रिकेट, टेनिस खेळणारा आहे. परंतु, सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
आपण आज करू, उद्या करू या गोष्टीमध्ये कायम टाळाटाळ करत राहिलो. मला सध्या या गोष्टींचा त्रास होत असल्यामुळे या सगळ्याची जाणीव होत आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या –
“उद्धव ठाकरेच 25 वर्षे मुख्यमंत्री राहतील”; सुप्रिया सुळेंना राऊतांचं प्रत्युत्तर
काॅंग्रेसमध्ये राज्यसभा उमेदवारीवरुन नाराजी, महासचिवांचा राजीनामा
“राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात संजय राऊतांनी आग लावली”
“विभास साठेंचा ‘मनसुख हिरेण’ होऊ नये”; किरीट सोमय्या आक्रमक
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना नितेश राणेंची जीभ घसरली, म्हणाले…