मोठी बातमी! राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ मुद्द्यावर होणार गंभीर चर्चा

मुंबई | राज्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या लालपरीला ओळखण्यात येत. सध्या मात्र लालपरी रस्त्यावर धावताना दिसत नाही. लालपरीचा सांभाळ करणारे हात सध्या संपावर आहेत.

राज्यातील बहुतांश सर्व बस आगारातील वाहतूक सध्या ठप्प आहे. अपुऱ्या सुविधा, पगाराची अनियमितता आणि सरकारी विलीनीकरण या मागण्यांसाठी एसटी कामगार सध्या राज्यभर आंदोलनं करत आहेत.

एसटी कामगारांच्या प्रतिनिधीमंडळानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत गाऱ्हाणं ऐकण्याची विनंती केली होती. शासन दरबारी मागण्या मान्य करून घेण्यासाठी राज ठाकरे सध्या चर्चा करत आहेत.

राज ठाकरे यांनी एसटीच्या संपाला पाठिंबा दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनं राज ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना दिलं होतं.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या घेऊन राज ठाकरे यांनी 5.30 वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. परिणामी या भेटीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज ठाकरे यांच्या भेटीनं हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण शरद पवार यांच्याकडं महाविकास आघाडीचा निर्माता म्हणून पाहिलं जातं.

गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. परिणामी राज्यातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हा संप लवकरात लवकर मिटावा यासाठी सर्वजण सध्या प्रयत्न करत आहेत.

राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि एसटीचे कर्मचारी सोबत आहेत. परिणामी  सिल्वरओकवर होत असलेल्या भेटीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचं भविष्य ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची एसटी कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर भेट घेतली होती. यावर राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं होतं.

राज ठाकरे यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं हे चांगलचं ठाऊक असल्याचं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी केलं होतं. परिणामी आज होतं असलेल्या भेटीवरून राज ठाकरे हे या संपावर तोडगा काढणार अशी आशा सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांची आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 “फुट पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ नितेश राणेशी आहे”

“नवाब मलिक हा गद्दार, त्याला पाकिस्तानला पाठवा”

अनिल देशमुखांना मोठा धक्का! ईडी कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

कडक सॅल्युट! भर पावसात महिला अधिकाऱ्यानं तरुणाला खांद्यावर उचलून नेत वाचवले प्राण

  “जे तलवार चालवतात ते तलवारीच्या घावानेच मरतात”