मोठी बातमी ! राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 5 जून रोजी होणारा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्याने राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दौरा रद्द झाल्याचे कारण स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांच्या पायाला एक ते दीड वर्षापूर्वी दुखापत झाली होती. पायाच्या दुखापतीमुळे हा दौरा स्थगित करण्यात आलेला आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

राज ठाकरे यांच्या पायावर पुढील आठवड्यामध्ये शस्त्रक्रिया होऊ शकते ,असंही बाळानांदगावकर यांनी सांगितलं आहे. तसेच अयोध्या दौरा स्थगित झाल्यावर होत असलेल्या टिकेला देखील बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर उलट सुलट चर्चा करण्याचं काही कारण नाही. येत्या 22 तारखेला पुण्यात सभा घेऊन ते बोलणारचं आहेत. 22 तारखेला ज्यावेळी ते बोलतील तेव्हा अयोध्या दौरा का तुर्तास स्थगित केला?, यावरही बोलतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

तसेच 22 तारखेला तुम्ही आणि आम्ही उत्सुक आहोत की ते नेमकं काय सांगणार आहेत, असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यास सुरक्षा हवी असेल तर पुरवतो, असं म्हणत डिवचले होते. त्यावरूनही बाळा नांदगावकरांनी निशाणा साधला आहे.

आता एवढेच काय बाकी राहिले होते. महाभारतातही संजय होता ना?, मग ते सोबत असले तरी आम्हाला काही चिंता नाही. सुरक्षा आपोआपचं मिळेल आम्हाला. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावे, असा टोला बाळा नांदगावकरांनी लगावला आहे.

दरम्यान, आम्ही धरूनच चाललो आहे की, दौरा स्थगित आहे. आता दौऱ्याला निघालो तरी बोलणार, नाही गेलो तरी बोलणार, स्थगित केला तरी बोलणार. मात्र, आम्ही 22 तारखेला बोलणारच, असं बाळा नांदगावकरांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! काॅंग्रेसचा शिवसेनेवर तब्बल 24 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

आयपीएलचा रोमांच! RCB च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत पण…

मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका 

“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली” 

…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!