मोठी बातमी! अखेर राणा दाम्पत्याचं आंदोलन मागे; दिलं ‘हे’ महत्त्वाचं कारण

मुंबई | भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात जोरदार राडा सुरु आहे. राणा दाम्पत्य मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार असल्यची घोषणा केली होती.

त्यानंतर मुंबईत मोठा राडा झाल्याचं समोर आलं. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला. अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचा हा मुंबई दौरा रद्द व्हावा, अशी काही लोकांचा इरादा आहे. पण त्यामुळे माझं आंदोलन मागे घेत आहोत, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

राज्यात पोलिसांना आणि सामान्य जनतेला त्रास होऊ नये, म्हणून आंदोलन मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात कुणाला घाबरण्याचं काम नाही. आम्ही कुठल्या दबावालाही बळी पडणारे लोक नाही, असा इशारा त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती केली होती की हनुमान जयंतीच्या निमित्ताने मातोश्रीवर आपण हनुमान चालीसा वाचा, असंही रवी राणा म्हणाले आहेत.

दरम्यान, मातोश्री आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात आहेत. मी कुठलंही चुकीचं भाष्य वापरलेलं नाही, असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“उद्धव ठाकरे म्हणजे बिनकामी पूर्ण पगारी मुख्यमंत्री”

  ‘मुख्यमंत्र्यांवर किती हल्ले झाले तरी त्यांनी….’; सुप्रिया सुळेंकडून कौतुकांचा वर्षाव

  ‘उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेला शनी’; राणा दाम्पत्यांचा हल्लाबोल

  राजकीय वर्तुळात मोठी खळबळ ! ‘या’ शिवसेना मंत्र्याच्या पीएवर गोळीबार

  “शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून….”; भाजपचा हल्लाबोल