मुंबई | मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाला आता नवं वळण आलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालात रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) दोषी आढळल्या होत्या.
पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात रश्मी शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. अशातच आता मोठी माहिती समोर आली आहे.
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
महाविकास आघाडी सरकार बनण्यापूर्वी शुक्ला यांनी खडसे आणि राऊत यांचे दोन वेळा फोन टॅप केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता खडसेंना समन्स बजावण्यात आलंय.
समोर आलेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे उद्या चौकशीला जाण्याची शक्यता आहे. चौकशीत खडसे कोणता खुलासा करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरूनच रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडीत नेत्यांचे फोन टॅप केले असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला होता. त्यामुळे या चौकशीतून काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
हनीमूनच्या रात्री असं काय झालं?, बायको रागानं लालबुंद झाली अन्…
“राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यास आश्चर्य वाटू नये”
“अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर…”
जगाचं टेन्शन वाढलं! कोरोनानंतर आता Rhinovirus एन्ट्री; डाॅक्टर चिंतेत
Sharad Pawar: राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार?, शरद पवार म्हणाले…