मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानवर झालेल्या आंदोलनात मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं आहे. एसटी कर्माचाऱ्यांनी चप्पल फेक आणि दगडफेक करत जोरदार घोषणाबाजी केली.
सिल्वर ओकवर घडलेल्या घटनेमागे अॅड गुणरत्न सदावर्ते यांचा हात असल्याची टीका केली जात होती. त्यावर खुद्द शरद पवारांनी देखील सुचक वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता मोठी माहिती हाती आली आहे.
या प्रकरणी आता पोलिसांनी एसटी आंदोलकांचे नेते गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं आहे. चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीये.
गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार ते पाच पोलीस दाखल झाले आहेत. कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केलाय.
गुणरत्न सदावर्तेंच्या जीवाला धोका असल्याचा दावा सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर शरद पवारांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात 23 महिलांचाही सहभाग असल्याचं समोर आलंय.
थोडक्यात बातम्या –
“सुप्रिया सुळे आणि इतरांची लाय डिटेक्टर चाचणी करा”
26/11 चा म्होरक्या हाफिज सईदला न्यायालयाचा दणका; मोठी शिक्षा सुनावली
‘सिल्वर ओक’वरील हल्ल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”
शरद पवारांच्या ‘सिल्वर ओक’वर आंदोलन करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा थेट इशारा!