आत्ताची मोठी बातमी! तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर, सुटकेनंतर म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्वर ओकवरील आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे.

काही दिवसापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

गुणरत्न सदावर्तेंची तब्बल 18 दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर येताच सदावर्ते यांनी हम है हिंदूस्तानी असा घोषणा दिल्या आहेत. त्यानंतर त्यांनी चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.

माझ्या परिवाराने किंवा मित्र परिवाराने अन्यायाविरूद्ध मला साथ दिली. महाराष्ट्रातील हिंदूस्थानी लोक आमच्यासोबत राहिले, असंही सदावर्ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जय श्रीराम म्हणणारे, जय भीम म्हणणारे, वंदे मातरम म्हणणारे, हम हिंदूस्थानी म्हणणारे नेहमी जिंकत असतात, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Elon Musk ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर CEO पराग अग्रवालने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“मी दहावीत दोनदा नापास झालो पण…”, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर

‘साहेबांसमोर सांगतोय, मला विक्रम काळेंची भीती वाटते’; अजित पवारांची जोरदार फटकेबाजी

नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…