नवी दिल्ली | रशिया युक्रेनच्या युद्धानं संपूर्ण जगावर गंभीर पडसाद उमटवले आहेत. अद्यापही हे युद्ध सुरु असून संपायचं नाव घेईना. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवरही मोठा परिणाम जाणवू लागला आहे.
रशियाने मंगळवारी नाटोवर छद्मी युद्धात गुंतल्याचा आरोप केला. यामुळे अणुयुद्धाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा इशारा रशियानं दिला आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, अणुयुद्धाचा धोका अजूनही कायम आहे. हे हलक्यात घेऊ नये. सोमवारी रशियाच्या चॅनल वन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलेलं पहायला मिळालं. त्यामुळे युद्ध आणखी भडकण्याी भीती कायम आहे.
युक्रेनला अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून मिळालेल्या मदतीला प्रत्युत्तर म्हणून रशियाचं हे मोठं वक्तव्य समोर आलं आहे.
गेल्या दोन महिन्याभरापासून रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे. या युद्धानं संपूर्ण जगावर गंभीर परिणाम केल्याचं पहायला मिळत आहे.
रशियाकडून युक्रेनवर बॉम्बहल्ले, हवाईहल्ले तसेच क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. या हल्ल्यांत युक्रेनमध्ये मोठी जीवीत तसेच वित्तहानी झालेली आहे.
रशिया युक्रेन या दोन्ही देशांतील युद्ध थांबावं अशी प्रार्थना सध्या सगळेजन करत आहेत. त्यामुळे आता हे युद्ध कधी थांबतं हे महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
रियान परागने मिळवले दिग्गजांच्या पक्तींत स्थान; IPL मध्ये केला ‘हा’ पराक्रम
“माझ्या हातात ईडी द्या, मग दाखवतो सगळ्यांना”; उदयनराजे कडाडले
PM आणि CM यांच्यातील वाकयुद्धात फडणवीसांनी उडी; ट्विट करत म्हणाले…
सोमय्यांची जखम खरी की खोटी?, डाॅक्टरांचा अहवाल आला अन् स्पष्टच झालं…