मुंबई | राज्याच्या राजकरणात शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नुकतंच संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत.
विधानसभा निवडणूक 2019 नंतर राज्याच्या राजकारणात परिवर्तन झालं होतं. या परिवर्तनाला शरद पवार आणि संजय राऊत यांचा मोठा वाटा होता.
आजही महाविकास आघाडीत काही तणाव निर्माण झाला तर या दोन्ही नेत्यांची भेट होते. संजय राऊत 10 च्या सुमारास पवार यांच्या घरी दाखल झाले आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचं कळत आहे.
संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी ते पवार यांच्या घरी आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाला पवार परिवाराला आमंत्रण देण्यात आलं आहे.
राज्यात सध्या एनसीबी, आयकर विभाग, ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत वाढ झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या राज्यासह देशात मुंबईतील एनसीबी प्रकरण गाजत आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अधिकाराचा गैरवापर करत राज्याला बदनाम केल्याचा आरोप केला होता.
मलिक यांच्या वानखेडे यांच्या आरोपांवरून राज्यात चांगलीच खळबळ माजली होती. या प्रकरणावरही आज राऊत आणि पवार यांच्यात चर्चा होणार असल्याचं कळत आहे.
मलिक यांनी दिवाळीआधी राज्यात फटाके फोडले आता मी फोडणार असं राज्याचे विरोधीपक्ष नेते देेवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या परिषदेच्या अगोदर या दोन्ही नेत्यांची भेट होतं असल्यानं या भेटीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या विविध मुद्द्यांवरून जोरदार कलगीतूरा रंगलेला आहे. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा बेेमुदत संप चालू असल्यानं या भेटीत यावर काही चर्चा होणार का?, याकडं सुद्धा राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
“2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”
“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”
शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ नियम बदलणार
शेवट गोड! टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रवी शास्त्रींना विजयी निरोप
‘देवेंद्रजी सॉरी, तुमचं नाव…’; मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे फडणवीसांना चिमटे