पुणे | वसंत मोरे (Vasant More)यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवले. त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्यांच्या संदर्भातील वक्तव्यानं खळबळ माजवलेली पहायला मिळाली. अशातच राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर पुणे शहर प्रमुख वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता.
वसंत मोरेंना राज ठाकरेंच्या वक्तव्याला विरोध करणं चांगलंच महागात पडलं. त्यांना थेट पदावरुनच हटवण्यात आलं आहे.
आता नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath babar) यांची पुणे शहर प्रमुखपदी वर्णी लागली आहे. वसंत मोरे यांनी मावळ्याच्या वेशातला फोटो ट्विट करत त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.
मनसेतून बाहेर पडल्यावर वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वसंत मोरे यांना शिवसेनेची ऑफर मिळाल्याचं पहायला मिळत आहे.
आता युवा शिवसेना नेते वरुन देसाई यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधत शिवसेनेत येण्याची ऑफर दिला आहे.
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडून त्यांना विचारणा करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
आता वसंत मोर ही शिवसेनेची ऑफर स्विकारार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील 3 दिवसांत उष्णतेची लाट, ‘या’ 12 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी
सर्वात मोठी बातमी! शिवसेना नेते यशवंत जाधव यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त
“गृहमंत्र्यांना कोण देतंय 100 कोटी? मीही गृहमंत्री होतो”
कोरोनाच्या XE व्हेरियंटबाबात तज्ज्ञांचा गंभीर इशारा म्हणाले…
Health | उन्हाळ्यात आंबा खाल्ल्यानंतर ‘या’ गोष्टींचं सेवन टाळा