मोठी बातमी! ‘या’ धक्कादायक कारणाने संजय राऊतांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली

मुंबई | नुकतंच ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली आहे. 29 डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस बजावल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावल्याचं नेमकं कारण समोर आलं आहे.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी HDILच्या वाधवा बंधूंवर कारवाई करण्यात आली आहे. वाधवा बंधू यांची चौकशी करत असताना प्रवीण राऊत यांचं नाव पुढे आलं होतं. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जातं.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाउंटवरून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे पैसे का पाठवण्यात आले होते? याची माहिती मिळवण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावली आहे.

संजय राऊत यांनी राज्यसभा सदस्यपदाचा शपथ पत्रात देखील या पैशांचा उल्लेख केला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्जाचे स्वरुपात आहेत, असं संजय राऊतांच्या शपथ पत्रात नमूद करण्यात आलं होतं.

दरम्यान, पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊत यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही माहित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरून काही गाण्याच्या ओळी शेअर करत अप्रत्यक्षपणे विरोधकांना थेट आवाहन केलं होतं.

संजय राऊत यांनी ट्वीटरवरून गाण्याच्या काही ओळी शेअर केल्या होत्या. ‘आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया’, असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं.

संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांना देखील नोटीस बजावण्यात आली होती. या वर्षाच्या शेवट म्हणजे 30 डिसेंबरला खडसे यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावं लागणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या बरोबरंच वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर राज्यभरातून केंद्र सरकार विरोधात विविध प्रतिक्रिया येत आहेत. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सीबीआय आणि ईडीला कोर्टात खेचण्याचा पवित्रा उचलला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

घाई करा!!! सोनं खरेदी करण्याची हीच आहे वेळ, 2021 मध्ये सोन्याचे भाव पोहचतील थेट….

राऊतांच्या पत्नीला ईडीची नोटीस मिळताच फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

पत्नीला ईडीची नोटीस मिळताच राऊतांची मोठी प्रतिक्रिया! गाण्याचे बोल लिहित थेट केलं आवाहन, म्हणाले…

‘शिवसेनेनं आम्हाला सल्ला देवू नये’; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांवर हल्लाबोल!

“देशात भाजपची तानाशाही सुरु आहे, विरोधकांनी एकत्र यायला हवं”